भारतात टिक टॉक सह ५९ ॲप आता कायमस्वरूपी बंद

0 32

नवी दिल्ली –  मागच्या काही महिन्यापूर्वी लडाखमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या वादानंतर भारतीय सरकारने चिनी ॲप भारतात तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पब्जी, टिक टॉक, शेअर इट, यूसी ब्राउजर त्यांनी मुख्य होते.

मात्र आता केंद्र सरकार कडून आपली भूमिका अजून कठोर करण्यात आली आहे. ५९ चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिक टॉक, बैदू, वी चॅट, यूसी ब्राउजर, क्लब फॅक्टरी, एम आय व्हिडिओ कॉल ( आणि बिगो लाईव्ह अशा अनेक मोठ्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

या अ‍ॅप्सवर केंद्र सरकारकडून याआधीच बंदीची कारवाई करण्यात आलेली आहे. गतवर्षी जूनच्या अखेरीस केंद्र सरकारने ज्या २६७ चिनी अ‍ॅप्सवर कारवाई केली होती त्यामध्ये यांचाही समावेश होता.

Related Posts
1 of 1,290

आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत केंद्र सरकारने चिनी अ‍ॅप्सविरोधात कारवाई केली होती. या अ‍ॅप्सकडून भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसंच सुरक्षेला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा गोळा करणं, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यांची उत्तर देण्यात कंपन्या असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: