भारतात कोरोना पासून मुक्त होणारे रुग्णांची संख्येत वाढ

नवी दिल्ली – करोनाचा प्रभाव देशात वाढत असताना दररोज विक्रमी आकडे समोर येत आहे. आज भारतात करोना संक्रमणाच्या आकड्यानं ५६ लाखांचा वर गेला आहे. २३ सप्टेंबर बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं कोरोनाची अपडेट आकडेवारी जाहीर केलीय. मागच्या २४ तासांत ८३ हजार ५२७ कोरोना संक्रमित रूग्ण समोर आले. तर मागच्या २४ तासात ८९ हजार ७४६ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
सलग पाचव्या दिवशी कोरोना संक्रमणातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या करोना संक्रमितांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.देशात आत्तापर्यंत एकूण ५६ लाख ४६ हजार कोरोना रूग्ण सापडले आहे. या मधील ४५ लाख ८७ हजार ६१३ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. ९० हजार २० जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे .
देशाचा रिकव्हरी रेट ८१.२५ टक्क्यांवर आहे. एकूण उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १७.१५ टक्के म्हणजेच ९ लाख ६८ हजार ३७७ वर आहे. तर भारतात मृत्यू दर १.५९ टक्के आहे. भारतात होणाऱ्या एकूण चाचण्यांपैंकी पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचा दर ८.७५ टक्के आहे.