DNA मराठी

भारताच्या निर्णयाला फटका :व्होडाफोनने जिंकला २२ हजार कोटी रुपयांचा खटला !

0 64

भारताच्या एका निर्णयाला मोठा फटका बसला आहे . व्होडाफोनने भारताविरोधातला सुमारे २२,००० कोटी रुपयांचा खटला जिंकला आहे .आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा खटला चालू होता.न्यायालयाने याप्रकरणी म्हटले आहे की- व्होडाफोनवर भारत सरकारनं लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा भंग करणारं आहे.

या निकालानंतर व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा भाव मुंबई शेअर बाजारात १२ टक्क्यांनी वधारला आहे.धक्कादायक म्हणजे आता भारत सरकारने व्होडाफोनला ४०.३० कोटी रुपये द्यावेत असा आदेशही न्यायालयाने दिला आहे ,त्यामुळे भारताला चांगलाच झटका बसला आहे .

Related Posts
1 of 2,489

व्होडाफोनने २००७ मध्ये हचिसनचा मोबाइल व्यवसाय ११ अब्ज डॉलर्सला विकत घेतला होता. मात्र २०१२ मध्ये भारताने केलेल्या कायद्यामुळे व्होडाफोनकडून कर वसुली करता येणार होती .याप्रणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयात खटला चालू होता ज्याचा निकाल वोडाफोन च्या बाजूने लागला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: