भारताचा ऐतिहासिक विजय, ३२ वर्षानंतर गाबावर ऑस्ट्रेलियाचा पराभव

0 27
ब्रिस्बेन – ऑस्ट्रलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभूत झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे याच्या नेतृत्वाखाली खेळताना २-१ ने चार कसोटी मालिकेमध्ये   विजय मिळवला आहे.  ऑस्ट्रलिया संघाने भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी  ३२८ धावांचे आव्हान दिले होता. या आव्हानचा पाठलाग करताना  सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन  गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचं आव्हान पार केलं आहे.
Related Posts
1 of 47

 पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत – बाळासाहेब थोरात

शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या डावांत ९ बळी घेत ऑस्ट्रेलियाला २९४ धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला.  ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील ३२ वर्षांपासून  अजिंक्य  असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारतानं चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघानं नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: