भानगावात मृतावस्थेत सापडलेला कावळा पॉझिटिव्ह………..

0 33

श्रीगोंदा –   अकरा जानेवारी रोजी श्रीगोंदा शहरातील होनराव चौकात होनराव शाळेच्या गेट समोर एक कबूतर व भानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना शेजारी एक कावळा मृतावस्थेत आढळल्या बाबत दोन्ही ठिकाणी स्थानिकांनी वन विभागास कळवले आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही पक्षी ताब्यात घेत पशुवैद्यकीय अधिकारी श्रीगोंदा यांच्याकडे तपासणीसाठी सुपूर्द केले होते. त्याच दिवशी संध्याकाळी औंध येथील डी.आय.एस.पुणे या संशोधन केंद्रामध्ये हे दोन्ही पक्षी उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यातील भानगाव येथील मृत कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. वसमतकर यांनी सांगितले.

                      त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे – अजित पवार 

देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू सारख्या आजाराने थैमान घातलेले असतांना, महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे. मात्र, श्रीगोंदयात पक्षी मृतावस्थेत आढळल्याने, सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर याबाबतचा अहवाल काल दिनांक १५ जानेवारी रोजी उपलब्ध झाला.

              राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारी पासून – वर्षा गायकवाड 

Related Posts
1 of 1,292

भानगाव मध्ये ज्या ठिकाणी कावळा मृतावस्थेत आढळला, त्या परिसरासह आसपास कोंबड्यांची खुराडी व पोल्ट्री फार्म तसेच जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये सोडियम हैपो क्लोराईडची फवारणी करण्यात येत असल्याचे डॉ. वसमतकर यांनी सांगितले आहे. संक्रमित पक्ष्यांच्या प्रवासातून हा प्रादुर्भाव पक्षांत वाढत जातो असेही त्यांनी सांगितले.

                          शरद पवारांनी घेतला धनंजय मुंडे यांच्याबाबत हा निर्णय………

होनराव चौकाच्या परिसरात सापडलेले मृत कबूतर तपासणीमध्ये निगेटिव्ह आले आहे. अशा पद्धतीने माणसांमध्ये संक्रमण होण्याचे प्रमाणही कमी आहे. मात्र, सर्वांनी काळजी घेणे, ज्या ठिकाणी कुकूटपालन किंवा कोंबड्याची खुराडी असतील अशा ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: