भाद्रपद पोळा उत्साहात साजरा

0 27

कर्जत-   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत आज भाद्रपद पोळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कर्जत तालुक्यातील कोरेगांव येथे कोरेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब शेळके यांनी सर्व शेतकरी बांधवांना कोरोनाच्या संकटात सर्व नियम पाळत पोळा साजरा करण्याच्या सूचना दिल्या.

कोरेगांव येथील पोळयाचा मान असलेल्या शेतकऱ्यांना बैल घेऊन वेशीत बोलावले सोशल डिस्टिंक्शन या नियमाचे पालन करत पाटील आमच्या मानाचे काय बघू पुढच्या वर्षी असे म्हणत पोळा साजरा केला.  यावर्षी कर्जत तालुक्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस झाला आहे. यामुळे बळीराजा समाधानी आहे. वेशीतुन जाऊन गाव प्रदक्षिणा झाल्यावर बैलांचा विवाह सोहळा पार पडला त्यांना पुर्ण पोळीचा नैवेद्य देऊन पोळ्यांची सांगता झाली   

Related Posts
1 of 1,359
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: