भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष आहे – महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार

0 33
धुळे –   राज्यात नुकत्याच झालेल्या  ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता.  मात्र राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा धुळे मध्ये  बोलताना  फेटाळला आहे.
राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर आणि भाजपा  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले कि  भाजप खोटी आकडेवारी देणारा पक्ष आहे.   तसेच चंद्रकांत पाटलांचं गणित कच्चं असून भाजप शेवटून पहिला येणारा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गणित कच्चं आहे. भाजकडून खोटी आकडेवारी सांगितले जाते. राज्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हा शेवटून एक नंबर आलेला पक्ष आहे असं अब्दुल सत्तार म्हणाले.
Related Posts
1 of 1,321

दरम्यान, राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडले होते. तर १८ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे सांगता येत नाही .

   बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपने ६ हजार जागा जिंकल्याचा दावा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाला नंतर केला होता. तर काँग्रेसनेही आपण ४ हजार जागा जिंकल्याचं म्हटलं होतं.

आखेर आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली मेगाभरतीची जाहिरात….

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: