भाजपसाठी धोक्याची घंटा : अनेक बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात !

राजकीय वर्तुळात खळबळ माजेल अशी बातमी राष्ट्रवादीकडून हाती येत आहे. माहितीनुसार, भाजपचे अनेक मोठे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगला सुरुवातदेखील झाली आहे.सरकार स्थापन झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भरती सुरूच आहे.
भाजपचे अनेक नेते हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहित पसरत आहे , त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची आणि आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.उत्तर महाराष्ट्रामधून पक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे .इतकंच नाही तर उत्तर महाराष्ट्र शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आमदारांची बैठक सुरू आहे.या बैठकीत भाजपच्या नेत्यांना प्रवेश द्यायचा की नाही हे याची चर्चा सुरु आहे.
मात्र जोपर्यंत भाजत नेते पक्षात प्रवेशाची माहिती देत नाहीत तोपर्यंत इतर पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली आहे.