भाजपने सारोळा, आपटी ग्रामपंचायत केल्या बिनविरोध तर खुरदैठनवर राष्ट्रवादीचा झेंडा

0 16

जामखेड – तालुक्यातील सारोळा व आपटी या दोन ग्रामपंचायतसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या दोन्ही ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व होते व पुन्हा झाले आहे.

आपटी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची सहावी वेळ आहे तर सारोळा ग्रामपंचायत दुसर्‍या वेळेस बिनविरोध होत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्याने भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे. तर खुरदैठन ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध होऊन ती राष्ट्रवादीकडे गेली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रोहित पवारांची सखोल चौकशी करावी – राम शिंदे

सारोळा ग्रामपंचायतसाठी सायंकाळी ४ वाजता विद्यमान सरपंच व भाजप तालुकाध्यक्ष अजय काशिद व मराठा गौरव (इंदूर) युवराज वस्ताद काशिद यांच्या नेतृत्वाखाली नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश वराट, सहाय्यक निवडणूक अधिकारी पि. जे. जाधव यांच्याकडे सादर केले.

बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे
Related Posts
1 of 1,290

प्रभाग १ हर्षद बंडू मुळे, अनिता राजेंद्र मासाळ, मनिषा बापूराव तांबे
प्रभाग २ रितु अजय काशिद, संतोष मुरलीधर खवळे, शहाजी सोन्याबाापू पवार
प्रभाग ३ चैताली शंकर जगदाळे, किरण मुरलीधर मुळे, संगीता दादाहरी बहीर

आपटी ग्रामपंचायतसाठी विद्यमान व भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरपंच नंदू गोरे यांच्या नेतृत्वाखाली सात उमेदवारांनी सायंकाळी पाचच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.

बिनविरोध निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे
प्रभाग १ – संध्या नंदकुमार गोरे, प्रविण आश्रू खवळे, मुक्ताबाई रमेश ढगे
प्रभाग २ – सुदाम शहाजी राऊत, छाया संजय भांडवलकर,
प्रभाग – ३ पंडीत सोनबा गोरे, अनिता शिवाजी गोरे

आपटी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध निवड होण्यासाठी सरपंच नंदू, सोनबा गोरे, सुभाष गोरे, दादासाहेब गोरे, कृष्णा खवळे, तेजराव गोरे नारायण खुपसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

खुरदैठन ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी एम एस साळवे यांच्याकडे सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला
प्रभाग १- अश्विनी रमेश ( बाळासाहेब) ठाकरे, निर्मला गोकुळ डुचे, दादा शहाजी डुचे
प्रभाग २ – मंदाबाई विठ्ठल डुचे, मनिषा अविनाश ठाकरे,
प्रभाग ३ – हनुमान कुंडलीक देवकाते, सुनिता मोहन डुचे
सारोळा, आपटी भाजपच्या ताब्यात आल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने खुरदैठन ग्रामपंचायत बिनविरोध केली.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: