DNA मराठी

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !

0 66

राजकीय वर्तुळात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे . भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सरदार तारासिंह यांचे निधन झाले .लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते  ते ८१ वर्षांचे होते.आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक ढासळली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टि्वट करुन ही माहिती दिली.

Related Posts
1 of 2,525

सरदार तारासिंह ह्यांनी मुलुंड विधानसभा मतदारसंघातून सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी भाजपाचा पाय भक्कम बनवला होता. १९९९ पासून ते आमदार होते तसेच त्यांनी विविध पदे भूषविली होती.तारासिंह यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून शोककळा पसरली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: