DNA मराठी

भाजपच्या नव्या टीम मध्ये पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना स्थान

0 107

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम जाहीर केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावं आहेत.

भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली. या नव्या कार्यकारिणीमध्ये महिला आणि तरुणांना मोठी संधी देण्यात आली आहे. अर्थातच महाराष्ट्रातले चार तरुण चेहरे यामध्ये आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून या अगोदरच मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. आता नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

Related Posts
1 of 2,488

गेल्या वर्षी निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं वृत्त येत होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आलेलं होतं. परंतू आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे.

विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण १३ जणांना नॅशनल सेक्रेटरी म्हणून आज नेमण्यात आलं आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रालते ४ नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत समावेश आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: