भाजपचे सहयोगी तीन नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आ. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश

0 182

जामखेड – मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथे गळती लागली आहे.

येथील विश्रामगृहावर कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.

Related Posts
1 of 2,057

यावेळी बोलताना नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले मी अपक्ष निवडून येऊन भाजपला विनाशर्थ पाठींबा दिला होता. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते तसेच शहराचा खुंटलेला विकास यामुळे प्रमुख कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चा करून राष्ट्रवादीचे उदयोन्मुख नेतृत्व आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ संघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघात जनतेला विश्वासात घेऊन आपले कार्य चालू केले आहे तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने पक्षाचे बळ निश्चित वाढत आहे आ. रोहीत पवार यांच्यावर या तीन नगरसेवकांनी टाकलेल्या विश्वासाला पक्ष स्वागत करतो लवकरच आ. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: