भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे – अब्दुल सत्तार

0 30
धुळे – राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षा वर टीका करत असताना त्यांनी  भारतीय जनता पक्षाच्या जेष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर सुध्दा टीका करताना म्हणाले कि मी जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही अशी घोषणा त्यांनी धुळे येथे केली आहे .

अब्दुल सत्तार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित शिवसेना मेळावा मध्ये बोलत होते . यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. त्यावेळी ते बोलत होते त्यांनी म्हणाले “जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणा नाही. तर राम मंदिर वर बोलतांना त्यांनी म्हणाले कि राम मंदिरच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे”, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

Related Posts
1 of 1,292

   दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर,करण्यात आले चार बद्दल 

पुढे बोलताना ते म्हणाले कि “राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला तरच शिवसेनेची ताकद दिसून येईल, हे सांगताना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ही घोषणा त्यांनी केली आहे.

हाफीज सईदला दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावली १५ वर्षाची शिक्षा 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: