भरारी पथकाने वसूल केले रुग्णालयापासून १४ लाख १७ हजार रुपये

0 41

अहमदनगर- कोरोनाच्या उपचार घेण्यासाठी जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते, त्यापैकी काही रुग्णांनी तक्रार केली होती की आपल्यापासून रुग्णालयात जास्ती बिल आकारणी करत आहे.
या तक्रारी नुसार भरारी पथक तपास करत असताना त्यांनी आज आखेर ५७४ बिलाची तपासणी पूर्ण केली आहे. पैकी ४१६ बिलामध्ये दोष आढळून आला आहे. या ४१६ बिलाची रक्कम जवळपास ७९ लाख दहा हजार ४५० रुपये इतकी या प्राथमिक चौकशी मध्ये रक्कम निश्चित करून संबंधित रुग्णालयापासून याबाबत खुलासा मागविण्यात आला होता. हे खुलासे प्राप्त झाल्यानंतर तसेच समितीने तपास केल्यानंतर आज आखेर ११५ बिलाच्या वसुली आदेश महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.  या ११५ पैकी ९२ बिलांची वसुली  महानगरपालिकेने केली आहे.
या ९२ बिला मधून १४ लाख १७ हजार ३० रुपये एवढी रक्कम रुग्णालयाकडून वसूल करण्यात आली आहे अशी माहिती पल्लवी निर्मळ उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तसेच अध्यक्ष भरारी पथक समिती यांनी दिली आहे.

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: