भगतसिंह ऐवजी चंद्रशेखर आझाद यांना वाहिली श्रद्धांजली , प्रियंका चतुर्वेदी ट्रोल !

शदीह भगतसिंह याच्या जयंतीनिमित्त देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे . मात्र शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना एक शदीह भगतसिंह यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहणे चांगलेच महागात पडले. त्यांनी भगत सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक फोटो ट्विट केला होता. यात शहीद भगत सिंह यांचा फोटो होता मात्र नाव चंद्रशेखर आझाद यांचं होत . यावरून प्रियंका चतुर्वेदी यांना सोशल मीडियावर ट्रॉलिंग चा सामना करावा लागत आहे .
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं होत – ‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद’ ! दरम्यान प्रियंका यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं . मात्र तरीही त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रॉलिंग ला सामोरे जावे लागले आहे.
या प्रकरणावर राजकीय सूर देखील उमटले आहेत .उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी म्हटले आहे-काही जणांना चंद्रशेअर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही, हे लज्जास्पद आहे !