बोरले ग्रामपंचायतची सत्ता राखण्यात भारत काकडे यांना यश

0 32

जामखेड – तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेची समजली जात असलेली बोरले ग्रामपंचायतीची सत्ता हनुमान ग्रामविकास पॅनलचे प्रमुख व शिलेदार माजी सरपंच तथा चेअरमन भारत काकडे व सुधीर हरिभाऊ काकडे यांनी गावाचा गड पुन्हा शाबूत ठेवत ७ पैकी ५ जागा जिंकत विरोधकांना धोबीपछाड दिली.

बोरले ग्रामपंचायतच्या निवडणूकीत जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासूनच मोठी आघाडी घेत शेवटपर्यंत टिकवून विजय संपादन केला. यामध्ये श्रीमती मनीषा सचिन काकडे यांनी सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला. सत्ता पुन्हा ताब्यात मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बोरले गावात विजयी उमेदवार आल्यावर ग्रामदैवत हनुमानाच्या चरणी लिन झाले. या मंडळाचे निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे सौ. मनीषा सचिन काकडे, सौ उर्मिला सौदागर काकडे, श्रीमती कंकुबाई सुखदेव पवार, जालिंदर दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय भिमराव शिंदे.

यावेळी पॅनेलप्रमुख माजी सरपंच भारत काकडे म्हणाले, ग्रामस्थांनी गेली पाच वर्षापासून आमच्यावर विश्वास दाखवला व गावात केलेल्या विकासाला साथ दिली त्यामुळे मतदारांनी सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले तरी त्यांचा विश्वास कधीही कमी होऊ देणार नाही गावांमध्ये आरोग्य, पाणी, वीज व मूलभूत गरजा भागवण्याचा कसोशीने या पाच वर्षात प्रयत्न करणार असल्याचे भारत काकडे यांनी सांगितले.

Related Posts
1 of 1,292

यावेळी सोसायटीचे चेअरमन महादेव काकडे, व्हाईस चेअरमन नागेश चव्हाण, शिवाजी येवले, वाल्मिक येवले, उत्तम काकडे, रावसाहेब काकडे, विलास काकडे, संतोष काकडे, भाऊ खरसाडे, जयसिंग पवार, संभाजी पवार, अमोल पवार, अनिल काकडे रवींद्र चव्हाण, रमेश चव्हाण, तुषार काकडे, जयहिंद काकडे, बाळू पवार, छगनराव काकडे, उद्धव चव्हाण, लहू काकडे, अभिजीत काकडे, लालासाहेब काकडे, सौदागर काकडे, भुजंग चव्हाण असे अनेक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: