बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज का घेतात; राखी सावंतने केला धक्कादायक खुलासा !

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास करताना ड्रग्स अँगल सापडला आहे . या ड्रग्स प्रकरणात अनेक बडे कलाकार अडकताना दिसत आहेत .रिया चक्रावतीला अटक झाल्यानंतर बॉलीवूड मधील ड्रग्ज अँगल मध्ये सारा खान , श्रद्धा कपूर ,राकुल ,दीपिका पदुकोण यांची नावे समोर आली आहे. या प्रकरणात एनसीबीने तपासाला सुरुवातदेखील केली आहे.
दरम्यान, राखी सावंतने बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्स का घेतात याचा धक्कादायक खुलासा केला आहे.तिने म्हटले आहे की ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत आहेत .ग्लॅमर टिकून राहण्यासाठी आणि वजन वाढू नये साठी त्यांना ड्रग्ज घेण्याचा सल्ला दिला जातो. एवढंच नाही तर मलाही वजन कमी करण्यासाठी काही ड्रग्ज घेण्याचा सल्ला सेदिला होता. परंतु ड्रग्जऐवजी योगाची निवड केली.
तिने पुढे म्हटले की बॉलिवूडमधील कलाकारांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी अशा शॉर्टकटचा वापर करतात असा दावा राखीने केला.