बेकायदेशीर अतिक्रमन बाबत नपा प्रशासन उदासीन असल्याने मेथा व मेहता यांचे उपोषण

0 13
 श्रीगोंदा- श्रीगोंदा शहरातील बालाजी मंगल कार्यालय व आसपास असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये मेथा व मेहता यांचे खाजगी क्षेत्र आहे. याठिकाणी असलेल्या रिलायन्स मोबाईल टॉवरच्या समोर मेहता यांच्या जागेमध्ये तसेच सरकारी रस्त्यावर अतिक्रमण करून गणेश बाबासाहेब भोस व त्याच्या सहकाऱ्यांनी अनधिकृत पत्र्याचे शेड बांधले आहे. त्याबाबत मेथा यांनी विचारणा केली असता, भोस यांनी अश्लील भाषा वापरीत मारहाण करील व बुलडोझर लावून सर्व बांधकाम पाडण्याची धमकी दिली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाचे पोलीस निरीक्षक व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने, दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर मेहता व मेथा हे कारवाईसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे . याबाबत त्यांनी अधिकृत प्रसिद्धी पत्र माध्यमांना दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की, मेथा व मेहता यांचे श्रीगोंदा बाजारतळा समोर मोटे यांच्याकडून काही वर्षांपूर्वी घेतले क्षेत्र आहे. या क्षेत्रात सध्या बालाजी मंगल कार्यालय तसेच रिलायन्स टावर(काढून टाकला आहे) एलआयसी ऑफिस व बालाजी फर्निचर आहे. रिलायन्स टावर काढल्यानंतर त्या नमूद जागेसमोर रस्त्यावरील काही भाग व टावर काढल्यानंतर खाली शिल्लक राहिलेल्या जागे समोर अनधिकृतपणे गणेश बाबासाहेब भोस व दत्तात्रय गलबले यांनी पत्र्याचे शेड मारून त्याठिकाणी ऑफिस तयार केले आहे.
मोटे यांच्या जागेपैकी काही जागा मागील काही वर्षांत भोस व इतर सहा लोकांनी खरेदी केलेली आहे. मात्र, शेजारी आल्यानंतर संबंधित सर्व जागेवरून भोस वाद घालत होते. यानंतर मोटे यांनी याबाबत माननीय न्यायालय श्रीगोंदा येथे सदर जागेबाबत दावा दाखल केला. बाबासाहेब भोस व त्यांच्या संबंधितांनी अनाधिकाराने ताबा घेऊ नये, कंपाऊंड पडू नये अशा स्वरूपाचा मनाईहुकूम आदेश मा. न्यायालयाने दिलेला आहे. बाबासाहेब भोस त्यांचा मुलगा गणेश तसेच दत्तात्रय गलबले हे मजूर लावून अनाधिकाराने कोर्टाच्या आदेशाचा भंग करून, अतिक्रमण करून, टपरी उभारत होते. यावर त्यांना विचारणा केली असता, त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली.सर्व बांधकाम पाडून टाकण्याची धमकी दिली.
Related Posts
1 of 1,292
प्रशासना सह प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी बाबासाहेब भोस यांनी पोलिस निरीक्षक श्रीगोंदा यांना शिवीगाळ केल्यावरून त्यांच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल आहेत. राजकीय बळाचा वापर करून, ते आमच्यावर दरहशत करीत आहेत, कोर्टाच्या आदेशास जुमानत नाही, पोलीस देखील दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधितांवर कारवाई करत नाहीत. आम्ही अल्पसंख्याक असल्याने नमूद राजकिय इसमावर कारवाई होत नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी भोस व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करावी या मागणीसाठी मेहथा व मेथा हे दिनांक २८ डिसेंबर रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: