बेकायदा दारू विक्रेत्यावर पोलीसांची धडक कारवाई १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

0 27

जामखेड –  जामखेड पोलिसांची बेकायदा दारू विक्रेत्यावर  धडक कारवाई सुरूच असून दि २१ रोजी जामखेड शहरातील अवैद्य देशी विदेशी दारूविक्री करणा-या विविध हॉटेलवर जामखेड पोलींसानी छापे टाकत कार्यवाही  करण्यात आली. बेकायदा दारू विक्रेत्याकडून  १२ हजार ५०० रुपये किमतीचा बेकायदा दारूसाठा जप्त केला.

२०२२च्या आयपीएल मध्ये खेळणार १० संघ

जामखेड शहरात विविध ठिकाणी अवैध देशी, विदेशी दारूची विक्री चालु असल्याची  गुप्तहेराकडून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली असता  त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत बीडरोड वरील हॉटेल कृष्णा, हॉटेल शिवराय, नगररोडवरील हॉटेल कावेरी, हॉटेल समता , तसेच चुंबळी फाट्यावरिल हॉटेल रसिका अशा ५ हॉटेलवर छापा टाकला असता १२ हजार ५०० रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या व हॉटेल चालक यांच्या विरूद्ध  महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम ६५ ( ई ) प्रमाणे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

हे पण पाहा- बोठेच्या संपर्कातील त्या व्यक्तींची झाली सखोल चौकशी

Related Posts
1 of 1,290

या कार्यवाहीत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गव्हाणे, पो.ना. गणेश फुलमाळी, संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, पो.कॉ संदिप राऊत, विजयकुमार कोळी , अविनाश ढेरे, संदिप आजबे विशेष कामगिरी बजावली. जामखेड तालुक्यात कोणत्याही गावात अवैद्य दारू विक्री, अवैध वाळुउपसा, मटका तसेच जुगार खेळला जात असल्यास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जनतेला केले आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर एक नव्हे तर वारंवार अत्याचार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: