बुलडाण्यातील अर्धवट बांधलेलं नाट्यगृह झालंय अवैध धंद्याचा अड्डा..

0 27

बुलडाणा –  महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच साहित्य, नाट्य, सांस्कृतिक कलावंतांची संस्कृत देखील या मायभूमी ला लाभली आहे. ही कला अजूनही रसिक आपल्या मनात जपत आहे , नट कलावंतांचे कलागुण जोपासले जावेत यासाठी नाट्यगृहांची निर्मिती केली जाते, मात्र बुलडाणा मध्ये गेल्या २३ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नाट्यगृहाचे बांधकाम अजून अपूर्णच असल्याने हेच अर्धवट नाट्यगृह आता नाटकांऐवजी जुगार, देहविक्री व्यवसाय , दारूचे पेग उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. गेल्या २३ वर्षांपासून या नाट्यगृहांच्या प्रती अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळींची अनास्था पाहायला मिळत आहे.

कलाकारातील सुप्त कलागुण अजून दृढ व्हावेत यासाठी १९९५ – ९६ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत त्या जिल्ह्यामध्ये २ कोटी रुपये देऊन नाट्यगृह निर्मित करण्याचे ठरविण्यात आले, त्यानुसार बुलडाणा नगर पालिकेने जागा उपलब्ध करून दिली आणि १९९६ मध्ये मंजुरात मिळालेल्या ३५० आसन क्षमता असलेल्या नाट्यगृहांचे मार्च १९९७ मध्ये सत्तेत आलेले आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुनील देवतळे यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांनी भूमिपूजन केले, तेव्हापासून मात्र बांधकामात अनियमितता आणि साहित्याच्या वाढत्या किमती पाहता बांधकामाला निधींचा अडसर येऊ लागला, निधीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे काही जाणकार सांगतात त्याचाच परिणाम म्हणजे दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही हे नाट्य गृह अजून कलावंताच्या कलांची वाट पाहत आहे.

       हे पण पहा – बाळ बोठे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल  

 

Related Posts
1 of 1,292

गेल्या सव्वाशे वर्षांपूर्वी बुलडाणा जिल्ह्यात स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे देखील बुलडाणा जिल्ह्याचेच सुपुत्र आहेत तसा मोठा रसिक वर्ग देखील जिल्ह्यात आहे त्यामुळे नाट्य परिषदेच्या नाटकांचा विदर्भ दौरा बुलडाणा पासून सुरुवात केला जातो आणि कलागुणांना वाव मिळवला जातो.  “तो मी नव्हेच” , “संगीत एकच प्याला” , “संगीत सौभद्र” , “संगीत संशय कल्लोळ” यासारख्या यशस्वी नाटकांचे प्रयोग जिल्ह्यात झालेत.

ब्रिटनमधून परतलेल्या सहा जणांना नवीन कोरोनाची लागण…. 

 

मात्र एका नाट्यगृहांची रसिक, कलाकारांची साधी भूक मिटवण्यास राजकीय उदासीनता अडसर ठरली आहे, या नाट्यगृहांसाठी विदर्भ साहित्य संघाकडून वेळोवेळी उपोषण, धरणे, निवेदन देण्यात आले , जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत प्रश्न उपस्थितीत करण्यात आले मात्र अजूनही सर्व निष्फळच… एखाद्या वास्तूंचे सर्वात रेंगाळले  आता तरी राजकीय नेतृत्वान्नी वाढीव निधी देऊन देहविक्री , जुगार , दारू यातून नाट्यगृहाला मोकळं करून कलावंतांचे कला गुण प्रकट करण्याचं खरं व्यासपीठ म्हणून हे नाट्यगृह नावारूपाला यावं हीच रसिक प्रेमींची मापक अपेक्षा.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: