बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका…

0 30
कोलकाता  –  बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार  सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने  त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली अशी माहिती सध्या समोर येथ आहे . त्यानंतर गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मग गांधीजींची हत्या करणाऱ्या गोडसेबद्दल काय? – असदुद्दीन ओवैसी

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. त्यानंतर लगेचच त्याला जवळच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला शुक्रवारी रात्रीपासूनच बरं वाटत नव्हतं. पण शनिवारी त्याने दैनंदिन वेळापत्रकानुसार काम करण्यास सुरूवात केली. सकाळी जिममध्ये व्यायाम करतानाच त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली. डॉक्टर्स त्याच्यावर उपचार करत असून हृदयविकाराचा झटका आल्यानेच असं घडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .

  अध्यक्षांच्या तालुक्यातच आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे झाले पाणी….

सौरव  गांगुलीबद्दलची माहिती   समजल्यानंतर बीसीसीआय  सेक्रेटरी जय शाह याने ट्विट करत म्हटले कि दादा तू लवकर बरा हो ही माझी इच्छा आहे आणि प्रार्थना पण  मी त्याच्या कुटुंबाशी बोललो आहे. दादा स्थिर आहेत आणि उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

Related Posts
1 of 1,334

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: