बिहार निवडणुका साठी शिवसेने जाहिर केली आपली स्टार प्रचारक यादी

0 41

मुंबई- बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा होत असून आता शिवसेनेनंही बिहारच्या निवडणुकीत उडी मरली आहे.
या निवडणुकी मध्ये शिवसेना ५० जागा लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली होती.
या मुळे आता शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह आणखी २० जणांच्या नावांचा समावेश आहे.
हे आहे शिवसेनेचे स्टार प्रचारक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनिल चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी, अशोक तिवारी यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

Related Posts
1 of 1,357
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: