बिग बॉस १४ चा ग्रँड प्रीमिअर आज 

0 41

मुंबई –  . बिग बॉसचा १४ वा सीजन आज पासून सुरू होत आहे. या मुळे आज  खरे अर्थानी बिग बॉसच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आज आणि उद्या १४व्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर असेल. नेहमीप्रमाणे यंदाचा सीझनही सलमान खानच होस्ट करणार आहे. प्रत्येक सीझन हा आधीच्या सीझनपेक्षा जास्त रंजक असतो. हा सीझनही खूप सारं मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.

बिग बॉसचा हा सीझन करोनामध्येही देण्यात आलेल्या लक्झरी होममुळे या वेळी चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घरात अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्या यापूर्वी कधीही देण्यात आल्या नव्हत्या. 

Related Posts
1 of 67

 
बिग बॉसनिर्मात्यानी आतापर्यंत कोणत्याही स्पर्धकांची नावं उघड केली नसली तर या सिझनमध्ये सुत्रा पासून मिळाले माहिती नुसार  मागच्या काही वर्षात चर्चेत आलेली राधे मा दिसणार आहे . त्याच बरोबर जान कुमार सानू, पवित्रा पुनिया, निक्की तांबोळी, जास्मीन भसीन, राहुल वैद्य, निशांत मालकानी आणि ऐजाज खान यांची नावं निश्चिती झाली आहेत. त्याचबरोबर रबीना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्याही नावांची चर्चा समोर येत आहे.     

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: