बिग बॉस १४ : करोनाच्या संकटामुळे ‘या’ गोष्टींवर असणार बंदी !

बिग बॉस एक फेमस रियालिटी शो आहे .हिंदी बिग बॉस चा १४वा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र यावेळी कोरोनामहामारीमुळे हा सीजन नेहमी सारखा नसेल. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता ‘बिग बॉस १४ मध्ये काही गोष्टीना बंदी असणार आहे .जाणून घेऊया कसा असेल बिग बॉसचा हा सीजन…
बिग बॉस१४ प्रोमोमध्ये स्पष्ट केलं की, यावेळी स्पर्धकांना घरातली कोणतीही कामं करावी लागणार नाहीत. एवढंच नाही तर बिग बॉसच्या घरी स्पर्धक म्हणून येणार्या प्रत्येक सदस्याला क्वारंटाइन करण्यात येणार आहे आणि त्यांची दर आठवड्याला त्यांची करोनाचाचणी देखील होईल.
तसेच स्पर्धकांसाठी डबल बेडची सोय नसेल . स्पर्धकांना आपला बेड,भांडी इतर लोकांशी शेअर करता येणार नाहीत. सुरुवातीच्या आठवड्यात स्पर्धक एकमेकांना स्पर्श करतील असा कोणताही टास्क होणार नाही .मनोरंजनासाठी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांसाठी मिनी थिएटर, मॉल, रेस्टॉरन्ट कॉर्नर आणि स्पा असणार आहे.