बिग बॉस साठी सलमानला मिळणार २५० कोटी

मुंबई- बिग बॉसचा १४ सीजन परत एकदा चर्चेमध्ये आला आहे या वेळी चर्चमध्ये येण्याच्या कारण म्हणजे बिग बॉस या शो चा सूत्रसंचालन करणारा अभिनेता सलमान खान हे होय सध्या बॉलीवूडमध्ये ही चर्चा चालू आहे की १४ सीजनच्या सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान खानने तब्बल अडीचशे (२५०)कोटी रुपये घेतल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये खूप जोरात आहे.
बिग बॉसच्या चौदावा सीजन येथे ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे हे आधी सप्टेंबरमध्ये सुरू होणार होता परंतु मुंबई मध्ये चाललेल्या पावसामुळे बिग बॉसच्या घरचा काम पूर्ण झाला नाही यामुळे हे शो ऑक्टोबर मध्ये सुरू केला जाणार आहे.
हे शो बारा आठवडे चालणार आहे सलमान खान एका आठवड्यामध्ये दोन वेळा शूटिंग करणार आहे. सलमानच्या हे सर्वात मोठा करार आहे अशा अशी बातमी बॉलीवूड मधून येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार या सीझनसाठी मागच्या काही काळात चर्चमध्ये राहिलेली राधे मा यालासुद्धा ऑफर दिली आहे असे समजते.