बिग बॉस फेम सई लोकूर प्रेमात, पाहा फोटो !

0 64

‘बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधून फेमस झालेली साई लोकूर आता पुन्हा चर्चेत आली आहे. याला कारण आहे तिने शेयर केलेला एक फोटो. एका खास व्यक्तीसोबतचा सईचा हा फोटो असून सईने कॅप्शनमध्ये ती प्रेमात असल्याचे सांगितले आहे.

Related Posts
1 of 131

सईने फोटो शेयर करत लिहले आहे की, स्वर्गात गाठी बांधल्या जातात यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणे आहेत आणि मला माझा साथीदार मिळाला. तिने या फोटोला #inlove असा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. मात्र या फोटोमध्ये साई आणि त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही.

या फोटोमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान सई ही बिग बॉस मराठी शोमध्ये चांगलीच चर्चेत होती .तिने हिंदी चित्रपट किस किसको प्यार करु या चित्रपटादेखील काम केले आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: