बिग बॅश मध्ये दिसणार हे भारतीय खेळाडू दिला संकेत…..

मेलबर्न – भारताचा माजी खेळाडू युवराज सिंग (सिक्सर किंग) परत एकदा क्रिकेटच्या मैदानात दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. युवराजचा मॅनेजर जेसन वॉनने याबाबतचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे क्रिकेट ऑस्ट्रेलियाही युवराजला एक चांगला क्लब शोधून देण्यासाठी मदत करत आहे.
आतापर्यंत भारताचा कोणताही खेळाडू बिग बॅश मध्ये खेळलेला नाही. याचा मुख्य कारण म्हणजे बीसीसीआय सक्रीय खेळाडूंना परदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. युवराजने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो या वर्षी आयपीएल सुध्दा खेळणार नाही . त्यामुळे युवराजचा परदेशातल्या क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .
युवराज सिंगसाठी क्लबचा शोध सुरू आहे आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमची मदत करत आहे, असं युवराजचा मॅनेजर जेसन वॉन याने सांगितलं.