बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार पंतप्रधान मोदींच्या हस्ते !

0 24

काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्तेहोणार आहे. काल स्वत: मोदी यांनी ट्विट करत हा कार्यक्रम पहा असे आवाहन केले आहे.आता मोदी या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून हा सोहळा पार पडणार आहे .माहितीनुसार ,या कार्यक्रमात मोदी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यासंबंधी बोलतील. हे कायदे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत याबद्दल मोदी माहिती देतील .तसेच मोदी आणि विखे पाटील यांचे मित्रत्वाचे संबंध होते, आमच्या वडिलांनी ही माहिती आम्हाला कधीच सांगितली नाही,असे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते . त्यामुळे मोदी या दोस्तीवरदेखील काय बोलणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे .

Related Posts
1 of 257

दरम्यान डॉ. विखे पाटील कायम काँग्रेसमध्येच राहिले. त्यांच्या एकूण राजकीय कारकीर्दीत त्यांचा भाजपशी संबंध आला नाही. आता मात्र, त्यांचा मुलगा आणि नातू भाजपमध्ये आहेत.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: