बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही

0 17

नवी मुंबई –  राज्यामधील काँग्रेस पक्षात लवकरच मोठा फेर बद्दल होण्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आपल्यावर असलेल्या एकपेक्षा जास्त जबाबदारीमुळे प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे आणि त्याच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष पक्षाला मिळणार आहे याची सुध्दा चर्चा होत आहे.

मात्र या चर्चमध्ये राज्याची  महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी बाळासाहेब थोरात हेच पुढील काळात काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे जर बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष राहिले तर राज्याच्या  पुढील  विधानसभा निवडणुकीमध्ये सरकार बनवल्याशिवाय राहणार असा विधान मुंबईत पक्षाच्या कार्यक्रमात केले आहे.
यशोमती ठाकूर मुंबईत प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये बोलत होते. हा कार्यक्रम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पार पडला . त्यावेळी यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.  
Related Posts
1 of 1,332
यशोमती ठाकूर यांनी म्हटले कि  मागच्या  विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या १२ ते १३ जागा येतील, असे बोलले जात होते. तेव्हा कोणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते. पक्ष सत्तेत नसतानाच्या काळात पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रत्येकाला बरोबर घेऊन चालणे, त्यांच्यामागे ताकदीनिशी उभे राहण्याचे काम थोरात यांनी केले आहे. यामुळे आणि पक्षातील सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेसच्या विधानसभेत ४४ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे थोरात प्रदेशाध्यक्ष राहिलेच पाहिजे, पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. अखिल भारतीय  काँग्रेसचे सचिव आणि राज्याचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी. एम. संदीप यांच्यासमोर यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: