बाळासाहेब ठाकरे यांच्या नऊ फूट उंच पुतळ्याचे २३ जानेवारीला अनावरण

0 25

नवी मुंबई-  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात येत आहे. शनिवारी २३ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी होणार आहे.

या कार्यक्रमात बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख अतिथी असणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी विशेष आतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Posts
1 of 1,292

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फूट उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: