‘ बार ‘ वाल्या दमानं


अहमदनगर : एकीकडे कोरोनाचं संकट त्रस्त करत आहे पण त्याला न जुमानता मद्यशौकिनांच्या मैफिली चांगल्याच रंगताहेत . शहरासह जिल्हाभरामध्ये परमिट नसलेल्या असलेल्या हॉटेल्स आणि बार मध्ये राजरोसपणे पार्ट्या रंगताना दिसतायेत , सकाळी १० ते ६ फक्त पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे परंतु ,तस काहीच चित्र न दिसत मद्यशौकिनांना पाहिजे त्या सुविधा पुरविल्या जात असून सोशल डीस्टनसिंग चा तर काहीच विचार नसल्याचे दिसून येतेय , बारचालकांना असलेल्या नियम आणि अटी सगळ्या गुंडाळून ठेवलेल्या दिसत आहेत . रात्री उशिरापर्यंत बार चालू असून कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम चालू आहे, विशेष म्हणजे उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसताहेत