बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाचा आज निकाल

0 180

लखनऊ –  बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायाधीश लखनऊतील विशेष न्यायालयात आज आपला निर्णय देणार आहे.   विशेष न्यायालयाने या केस मध्ये आपला निर्णय देण्यासाठी आजचा दिवस निश्चित केला आहे. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण ४९आरोपी होते, त्यापैकी ३२ सध्या जिवंत आहेत आणि १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं आहेत. सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती एस के यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व ३२ आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर राममंदिर निर्मितीसाठी स्थापन झालेल्या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

 परंतु या प्रकरणातील आरोपी उमा भारती आणि कल्याण सिंग यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. उमा भारती आणि कल्याण सिंग सध्या कोरोनातून बरे झाल्यावर विश्रांती घेत आहेत. १९९२ मध्ये कल्याण सिंह यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात बाबरी मशीद पाडली गेली होती.

Related Posts
1 of 2,084

हे आहे ३२ आरोपी

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: