बाबरी मज्जिद विध्वंस प्रकरणात ३२ आरोपी निर्दोष मुक्त

लखनऊ – बाबरी मज्जिद विध्वंस प्रकरणात आज सीबीआयचे विशेष न्यायलयाने आज आपला निर्णय दिला आहे. त्यांनी लाल कृष्ण आडवाणी सह पूर्ण ३२ आरोपींना निर्दोष मुक्तता केली आहे.या निर्णय साठी कोर्टामध्ये १८ आरोपी उपस्थित होते तर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह आणखी काही आरोपी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली हजेरी कोर्टामध्ये लावली.हे निर्णय २००० पानाचा आहे. या निर्णय मध्ये कोर्टाने स्पष्ट केले आहे की ही घटना अनियोजित नव्हती.
हे आहे ३२ आरोपी –
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल, जयभानसिंग पवईया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला , आरएन श्रीवास्तव, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.