DNA मराठी

बाप्पाला आणि सवाऱ्यांना प्रथमच जागेवर निरोप

0 71

अहमदनगर : धूमधडाक्यात दरवर्षी बाप्पाना आणि सवाऱ्यांना  निरोप दिला जातो परंतु यावर्षी कोरोनाचं संकट आल्यामुळे सोशल डीस्टन्सिंग , मास्क  , स्टे होम- स्टे सेफ  या गोष्टीना  सामोरे जावे लागत  असून कोरोनामुळे सणवार शांततेत पार पडत आहेत तसेच लग्नासारखे मोठे कार्यक्रम देखील  कमी लोकांमध्ये केले जातायेत . बाप्पा येणार म्हणल्यावर जी तयारी असते त्यापेक्षाही जास्त तयारी विसर्जन मिरवणुकीची असते , परंतु कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीला स्थागिती देण्यात अली आहे . भिंगारमध्ये गणेशाचं विसर्जन हे नवव्या दिवशी केलं जातं . भिंगार येथील मानाच्या  देशमुख गणपतीची उत्थापन पूजा जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंग  यांच्या हस्ते रविवारी पार पडली . सनई चौघड्याच्या मंजुळ सुरात मंदिरातच फुलांनी  सजवलेल्या कृत्रिम हौदात  गणेशमूर्तीचं विसर्जन करण्यात आलं . इतिहासात प्रथमच गणेशाचं  असं विसर्जन करण्यात आलं . मोजक्यात भाविकांच्या उपस्थितीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करून विसर्जन करण्यात आले . 

Related Posts
1 of 2,492

देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या नगरच्या मोहरम  सवाऱ्यांचे विसर्जन देखील जागेवर करण्यात आले असून इतिहासात प्रथमच इतक्या शांततेत आणि कमी भाविकांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आले . दरवर्षी भरपूर गर्दी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांनी सांगता होत असून रस्त्याच्या दुतर्फा शरबतांच्या गाड्या असतात . रात्री १० पर्यंत हि मिरवणूक चालते [परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक शांततेत पार पडली . पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मिरवणूक पार पडली . 

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: