बाजार समितीची जागा वाचविण्यासाठी महाआघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरली

0 27

अहमदनगर – पंचवीस वर्षाच्या कालखंडात आम्ही राजकारणात सक्रिय असतांना आम्ही कधीही ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले नाही.  माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांनी व त्यांच्या सहकार्यांनी पै-पै गोळाकरून नगर तालुक्याच्या विकासाठी मार्केट कमिटी स्थापन केली. तसेच झोपडी कँन्टिनच्या परिसरात तालुका दूध संघ आणि जिल्हा दूध संघाची इमारत उभी केली. मात्र, काही विघ्न संतोषी लोकांनी दूध संघ बंद पाडून इमारत विकून नगर तालुक्याचे वाटोळे केले. आता मार्केट कमिटीवर त्यांचा डोळा असून ती विकण्याचा प्रयत्न आहे. हे रोखण्यासाठी नगर तालुक्यात महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले असल्याचे   प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले.

नगर तालुक्यातील मांजरसुंबा व डोंगरगण येथे महाविकास आघाडीच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूकीचा प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा  परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, गोविद मोकाटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष उध्दव दुसुंगे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भगत, शंकरराव कदम, अ‍ॅड. विजय कदम, डॉ. राम कदम, प्रशांत कदम, मलेश कदम, नानासाहेब कदम,एकनाथ कदम,बाळासाहेब कदम, भाऊसाहेब कदम, सुर्यभान कदम, दादू वाघमारे, दत्तू कदम, देविदास कदम, विश्‍वास कदम, अंकुश कदम, सागर वाघमारे , गोरक्षनाथ कदम , सुरेश कदम , नानासाहेब कदम , मारूती कदम सर्जेराव मते , अशोक मते, डॉ. रावसाहेब भुतका , गमाजी मते , दत्तात्रय खेत्री , जालींदर आढाव, बबन पटारे , संजय पटारे , संजय आढाव , तुळशीराम भुतकर , रावसाहेब काळे, बाबासाहेब मते , रावसाहेब शिरसाठ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

             हे पण वाचा – बाळ बोठे विरोधात स्टँडिंग वॉरंट. बाळ बोठेच्यात अडचणीत  

गाडे पुढे म्हणाले, महाविकास आघाडीने आज शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करण्याचे काम केले आहे. नगर जिल्ह्याला 1 हजार 350 कोटी कर्ज शेतकर्‍यांचे माफ केले. जिल्हा बँक व मार्केट कमिटी ताब्यात घेण्यासाठी शिवाजी कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळत्या भांडवला चे वाटप केले. हे कर्ज मार्च अखेर भरावे लागणार आहे. त्यासाठी दहा ते बारा टक्क्यांनी पैसे शेतकर्‍याना भरावे लागणार आहे. तसेच नगर तालुक्याची कामधेनु असणारी बाजार समिती ची दहा एकर जागा विकण्याचा डाव कर्डिलेंचा आहे. दूध संघ कवडी मोलाच्या भावाने विकला आता बाजार समितीच्या जागेवर कर्डिले यांचा डोळा आहे. तसेच या निवडणुकीत मतदारा ना आता फोन येणार आहे. संकटकाळात कर्ज वाटप केले आता भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या. मतदारांनी ही त्यांना सांगावे पंधरा तारखेच्या आत कर्ज स्वरूपात वाटप केलेले खेळते भांडवल माफ करा आम्ही तुमच्या बरोबर आहे, असे सांगा.

Related Posts
1 of 1,301

पत्रकार बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा जिल्ह्यातील २१ पोलीसठाण्याला आदेश 

शेळके म्हणाले नगर तालुक्याची अपप्रवृत्तीच्या लोकांना त्याची जागा दाखवण्यासाठी एकत्र आलो आहे. तालुक्यातील सेस्था हडप करण्याचा याचा धंदा आता बंद करणार आहोत. तालुक्यातील अपप्रवृत्ती हटवणार आहोत यासाठी महा आघाडी च्या उमेदवारांना विजयी करा.

आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी पुढच्या महिन्यात लिलाव होण्याची शक्यता

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: