बर्निग ट्रक चा थरार

0 44

मिरजगांव – कर्जत तालुक्यातील बाभूळगाव(खालसा) शिवारात नगर सोलापूर मार्गावर बर्निग ट्रक चा थरार आज पहाटे प्रवाशी,वाहन चालकांनी अनुभवला.

या रस्त्याच्या कडेला सादर मालवाहतूक ट्रक जळत होती. मात्र या बाबत मिरजगाव पोलीस दुरक्षेत्रासह कर्जत पोलीस स्थानक ही अनभिज्ञ होते.या ट्रकला नंबर प्लेट नसून सरकार नाव आहे.तसेच यात काय माल होता, ती कुठे चालली होती ,किंवा कोठून आला ही आग कशाने लागली.

Related Posts
1 of 1,371

हा अपघात की घातपात असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.या बाबत समजलेली माहिती माहिती अशी की नगर सोलापूर मार्गावरील बाभुुुळगाव(खालसा) गावाच्या पुढे साधारण दोन कि. मी. अंतरावर शिवारात सतरा गावे पाणी पुरवठा योजनेसाठी असणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या टाकी पासून साधारणतः शंभर मीटर अंतरावर मालवाहतूक का ? का ऊस वाहतूकीसाठीचा ट्रक हे अध्याप तरी समजले नाही ही ट्रक जळत असताना तेथे चालक आणि अजून कोणीच नव्हते.त्यामुळे हा मोठा संशयास्पद विषय बनला आहे . सदरील ट्रक जळून खाक झाला आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: