बच्चू कडू यांना कोरोनाची लागण , स्वतः ट्विट करून दिली माहिती !

सध्या देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सामान्यांसहित कित्येक दिग्गज मंडळींना कोरोनाची लागण होत आहे. आता राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी नितीन राऊत,हसन मुश्रीफ यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. आता बच्चू कडू यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
बच्चू कडू यांनी ट्विट करत म्हटले आहे – “माझी कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. कृपया संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करुन घ्यावी”. कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता सर्वानी स्वतःची काळजी घेतली पाहिजे . गर्दी च्या ठिकाणी जाणे टाळायला पाहिजे . भारताभोवती दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे .
जरी जागतिक रिकव्हरी रेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर पोहचला असला तरी अजून कोरोना प्रतिबंधक लस मिळाली नाही . भारतीय तज्ज्ञांच्या मते २०२१ सालच्या मध्यापर्यंत कोरोनाचं संकट कमी होऊन आपण सामान्य परिस्थितीत येऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घेणे हाच बचावासाठी योग्य उपाय आहे.