बँकेत असाही गोंधळ ; काढले चक्क पावणेतीन कोटी


अहमदनगर : शहर सहकारी बँकेने नवीनच गोंधळ घातला आहे तो म्हणजे चक्क कर्जदाराची परवानगी नसताना त्याच्या कर्जखात्यातून पावणेतीन कोटीची रक्कम परस्पर अन्य खात्यातून वर्ग केल्याबद्दल कोतवाली पोलीस ठाण्यात बाबुलाल बच्छावत यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय . जानेवारीमध्ये त्यांचे कर्ज मंजूर झाल्यानंतर १० कोरे चेक त्यांनी बँकेला दिले . ८ चेक त्यांच्या विना परवानगी वर्ग केल्याचे कळताच त्यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांना व्यवस्थित उत्तरे मिळाली नाही . त्यांनी वकिलामार्फत चौकशी केल्यानंतरही योग्य खुलासा झाला नाही . आणि रक्कम पुन्हा खात्यात जमा करण्यासही बँकेने नकार दिला . त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला .