फोर्ब्स मासिकाने घेतली डॉक्टर बी के दीपक हरके याँच्या कार्याचीं दखल

0 19

अहमदनगर – फोर्ब्स मॅगझिन हा १०० वर्षांचा जुना ब्रँड आहे आणि तो व्यवसाय विश्वातील सर्वात जास्त ओळखता येणारा आणि सन्मानित ब्रांड आहे. २००० साली हा ब्रांड भारतात सुरू झाला  आणि थोड्याच अवधीत त्याने स्वत: ला देशाचे प्रीमियर बिझिनेस मॅगझिन म्हणून स्थापित केले. फोर्ब्स इंडियाच्या सामग्रीने  लोकांच्या जीवनात एक नवीन दृष्टीकोन आणला आहे आणि देशातील सर्वात प्रभावी व्यवसाय मासिक म्हणून विकसित झाले आहे.

             राज्यात आठ जणांना नवीन कोरोनाची लागण – आरोग्यमंत्री राजेश टोपे 

“Modern India’s Game Changers” शिर्षक असलेल्या या अंकामध्ये डॉक्टर बी के दीपक हरके याँच्या कार्याचीं फोर्ब्स मॅगझिनने दखल घेतली आहे . राळेगणसिद्धी येथे समाजसेवक श्री अण्णा हजारे यांना डॉक्टर बी के दीपक हारके यांनी फोर्ब्स मॅगझिन भेट दिले.

    हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरण । बाळ बोठेच्या स्टँडिंग अर्जावर बुधवारी होणार निर्णय

Related Posts
1 of 1,290

१७४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ दीपक हारके यांनी  “सर्वात  मोठी रांगोळी” “सर्वात मोठे शुभेच्छा पत्र”,  “सर्वात मोठे वर्तमानपत्र”, “सर्वात मोठी पतंग”, “सर्वात मोठे पोस्ट कार्ड”, “सर्वात मोठे अंतर्देशीय पत्र”, “सर्वात मोठे पॅम्प्लेट”, “सर्वात मोठी ट्रॉफी”, “सर्वात मोठे पुस्तक”, “सर्वात मोठा वेडिंग बुके” “ सर्वात मोठे फुलांचे शिवलिंग”, सर्वात छोटी राखी”, “सर्वात छोटे कमळ”, “सर्वात छोटे बॅडमिंटन रॅकेट”, “सर्वात मोठा गुलाबांचा गुच्छ” या सारखे १७४ विश्वविक्रम करून  भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार  करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल फोर्ब्स मासिकाने घेतली आहे.

उद्या कदाचित मला सुध्दा ईडीची नोटीस येईल – रोहित पवार

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: