फेसबुक व्दारे मैत्री करून परदेशी महिला असल्याचे भासवून ७० लाख रूपयाला गंडा

0 15

अहमदनगर – दिनांक २ सप्टेंबर २०२० ते दिनांक २७ ऑक्टोंबर २०२० यातील उच्च शिक्षीत फिर्यादी यांना
+४४७३९२३६४९६२ हा व्हॉटसअॅप नंबर धाकर Amelia Meghan Smith, ८३७६०३६०२२ हा मो. नंबर धारक महिला व ८८२६५३७३५२ हा मो. नंबर धारक रिझव बँक अधिकारी असल्याचे बतावणी करणा-या ईसमांनी व दिल्ली, वाराणसी, अरूणाचल प्रदेश येथील विविध बँकेचे ६ खातेदारांनी यांनी खोटी ओळख सांगून मैत्री करून भारतातील हर्बल प्रोडॉक्ट कंपनी कडून आर्युवेदीक कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा करून शासकीय कार्यालयाचे बनावट मेलव्दारे खोटी कागदपत्रे पाठवून एकुण ७०,८७,०००/- रू. ( सत्तर लाख सत्यांशी हजार रूपये) रुपयाची फसवणुक केली आहे. वगैरे मा चे फिर्यादीवरून सायबर पोलीस स्टेशन । गुरंन २२/२०२० भा.द.वी ४१९,४२०,४६७,३४ सह माहीती तंत्रज्ञान अधि-२००० चे कलम ६६(D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाले नंतर मा.श्री. मनोज पाटील साो, पोलीस अधीक्षक , अहमदनगर, मा.श्री. सौरभ अग्रवाल साो. अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अंबादास भुसारे, पोलीस निरीक्षक ,तपासी अधिकारी यांचे नेतृत्वाखाली पोसई, श्री. प्रतिक कोळी , पाहेकॉ योगेश गोसावी, उमेश खेडकर, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिंगबर कारखेले, राहुल हुसळे, विशाल अमृते, पोकॉ अरूण सांगळे, म.पोकॉ. पुजा भांगरे, पोकॉ. प्रशांत राठोड ,पोकॉ.गणेश पाटील, चापाहेकॉ वासुदेव शेलार या पथकाने अत्यंत क्लीष्ट स्वरूपाचा तपास असलेल्या सदर गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषण करून सदर गुन्हयातील संशयीत आरोपी हे दिल्ली परीसरातील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार वरील पथकाने दिल्ली येथे व्दारका , आया नगर परीसरात सलग ७ दिवस थांबून आरोपी हा वेळोवेळी त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने गुन्हयातील आरोपींची तांत्रीक तसेच स्थानिक पातळीवर बातमीदार तयार करून माहिती काढून आरोपी राहत असलेल्या अत्यंत दाट लोकवस्ती असलेल्या भागात घराजवळ पाळत ठेवून संशयीत आरोपी घरी येताच त्यास छापा टाकून ताब्यात घेऊन नाव गांव विचारात त्याने त्याचे नाव IDUH KESTER उर्फ इब्राहीम वय ३३ रा.Ligous .Asabalud, Nigeria ११२ हल्ली रा.बी ३७,फेज वन,आया नगर,दक्षिण दिल्ली असे सांगीतले सदर आरोपी कडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर गुन्हा केल्याचे कबूल केले असून सदर आरोपी यास दिनांक २०/१२/२० रोजी अटक करण्यात आली असून त्याची दि.२४/१२/२० पावेता पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.

Related Posts
1 of 1,291

सदर अटक आरोपी नायजेरीयन नागरीक असून अशा प्रकारे फेसबुकव्दारे मैत्री करून विविध बहाणे करून नागरीकांना लाखो रूपयांना गंडा घालणा-या टोळीतील सदस्य आहे. अशा स्वरूपाच्या गुन्हयांना नायजेरीयन
फ्रॉड असे ही म्हणतात. अशा प्रकारचे आरोपी हे इंटरनेट, सोशल मिडीया , मोबाईल वापरण्यात अत्यंत चलाख
असल्यामुळे त्यांना ट्रेस करून पकडणे अवघड असते.

सदर नायजेरीयन फ्रॉड करणारे गुन्हेगार हे दिल्ली परीसरात मोठया प्रमाणात आहे. तेथील अवैध कॉलनीमध्ये वेळोवेळी जागा बदलून राहातात. सदर आरोपी यांने अशा प्रकारे किती लोंकाना फसवीले आहे तसेच त्यांचे इतर साथीदार यांचे बाबत सखोल तपास करण्यात येत आहे.

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: