फरार आरोपी बाळ बोठे हा अहमदनगर जिल्ह्यातच ?

0 38

अहमदनगर –  एकीकडे अहमदनगर जिल्हा पोलीस रेखा जरे  हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला फरार घोषित करण्यासाठी पारनेर न्यायालयात स्टॅंडिंग अर्ज दाखल केला आहे.  तर दुसरीकडे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार बाळ बोठे अहमदनगर जिल्ह्यातच आहे. मागील चार दिवसापूर्वी श्रीगोंदा मध्ये बाळ बोठे आपल्या वाडीत जाऊन पाहुणचार घेतला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  हे पण पहा – रेखा जरे हत्याकांड प्रकरण । बाळ बोठेच्या स्टँडिंग अर्जावर बुधवारी होणार निर्णय

त्यानंतर विसापूर फाटा येथे एका हॉटेल मध्ये जाउन  पत्रकार बाळ बोठेने वडापाव खाल्ला . नंतर चिंभळारोड वरील एक मच्छी थाळी स्पेशल सप्राच्या हॉटेल मध्ये जाऊन केला जेवण तसेच चिंचणी घोड धारण येथे एका तांत्रिक कडे जाऊन रेखा जरे हत्या प्रकरणातून सुटके साठी घेतली अघोरी विद्देची मदत.  या मिळालेल्या माहितीवरून असा प्रश्न उपस्थित होतो कि जर बाळ बोठे जिल्ह्यातच आहेत तर पोलीस डिपार्टमेंट काय करतो  ? रेखा जरेच्या मुलगा म्हटल्याप्रमाणे या प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप होत आहे का ?

Related Posts
1 of 1,290

         बाळ बोठेला लपविण्याकरीता कोणत्या मंत्र्यानी ताकत पणाला लावली आहे का ?   

यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी जातेगाव घाटात निघून हत्या करण्यात आली होती . त्यातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अजूनही फरारच आहे या प्रकरणातील ५ आरोपींना अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी ताब्यात घेतला होता आणि पत्रकार बाळ बोठे हा याप्रकरणातील मुख्यसूत्रधार आहे याची माहिती  सार्वजनिक केली होती.  मात्र पत्रकार बाळ बोटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही . कधी ते नाशिक मध्ये असल्याची चर्चा होते तर कधी अहमदनगर जिल्ह्यातच आहे अशी चर्चा होत आहे. जर बाळ बोटे हा जिल्ह्यातच आहे तर त्याला अटक का नाही ?

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: