DNA मराठी

फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

2 196

मुंबई  – छत्रपती शिवाजी महाराजच्या या महाराष्ट्रात इतका घाबरट आणि लोकशाही विरोधी सरकार या पूर्वही कधीही बघितला नाही अश्या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद फडणवीस यांनी सरकार टीका केली. 

ते म्हणाले कि ,आज जे कोणी सरकारच्या  विचारला विरोध करणारे व्यक्ती असतील,पत्रकार असतील या सर्वांचा दमण करण्याचा काम सरकार करत आहे. देवेंद फडणवीस याने अभिनेत्री कंगना रणौत याचे बीएमसी ने पडलेल्या बांधकामचा विरोधात सरकार वर टीका केली आहे. एक बांधकाम कालपर्यंत त्याच ठिकाणी होते परंतु कोणी तुमच्या बद्दल काही बोलले या मुळे ते बांधकाम अवैध आहे म्हणून ते तोडले जाते, तर मुंबई मधील इतर अवैध बांधकामं का तोडले जात नाही? असा प्रश्न त्यानी सरकारला विचारले आहे.

दरम्यान कंगना रणौतयाने केलेले त्या विधानाचा विरोध केला आहे जर कोणी मुंबई आणि महाराष्ट्रा विरोधात बोलत असेल तर त्याचा समर्थन करता येणार नाही असे फडवणीस याने एक व्हिडिओ मधून सांगितले आहे.

Related Posts
1 of 2,489

            
काय होता प्रकरण- कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर पालिकेने आज कारवाई केली. या कार्यालयातील काही अनधिकृत असलेलं अंतर्गत बांधकाम पाडण्यात आलं आहे. तसंच मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळं कंगना शिवसेनेच्या रडारवर आली आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेनं कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकानं कंगनाच्या बंगल्याची पाहणी केली होती.

त्यात काही बांधकाम सुरू असल्याचे आढळलं. त्यानंतर पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. पालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्यासाठी गेले असता तिथं हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोटिस स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेनं कार्यालयावर नोटीस चिकटवली होती. आणि आज ते बांधकाम तोडण्यात आले.   

Show Comments (2)
error: Content is protected !!
%d bloggers like this: