प्रियंका गांधी काँग्रेससाठी पनौती; ‘या’ भाजपा नेत्याचे वक्तव्य !

बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशात कुठे ना कुठे निवडणुकीचे वारे वाहत आहे .यातूनच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं खेळ सुरु झाला आहे. मध्यप्रदेश मध्येदेखील निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी प्रचाराला सुरूवात झाली आहे.त्या निवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.यावरूनच भाजप नेते जयभान सिहं पवैया यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे.
जयभान सिहं पवैया यांनी म्हटले आहे की “प्रियंका आमच्यासाठी चुनौती नाही तर काँग्रेस साठी पनौती आहे, आम्ही वाट बघतोय की येथे भाव-बहिणीमधून कोणीतरी एकाचे पाऊल तर पडेलच ! प्रियांका येत असल्याचं BJP स्वागत करत आहे .
माहितीनुसार, प्रियंका गांधी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.मध्य प्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.