प्रणवदांची प्रकृती खालावलीप्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून.


दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याची माहिती. रुग्णालयाकडून देण्यात आली आहे , त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयाकडून प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीची माहिती देण्यात आली. “प्रणव मुखर्जी यांच्यामध्ये फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याची लक्षणं दिसत असून प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले असून त्यांच्यावर तज्ञांची डॉक्टरांची टीम सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती रुग्णालया कडून देण्यात आली आहे.