पोलीस भरती मध्ये मराठा समाजाच्या तरुणांना मोठा दिलासा – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि ते आरक्षण टिकवण्याचा सरकार पूर्ण प्रयत्न सुद्धा करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या १२,५०० रिक्त पदाच्या पोलीस भरती प्रक्रियेत मराठा समाजाचे १३ टक्के जागा राखीव ठेवूनच भरती होणार आहे. असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.दरम्यान काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत १२ हजार ५०० रिक्त पोलीस भरती भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत पोलिस शिपायांची १२ हजार ५०० रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीनंतर ही माहिती पत्रकारांना दिली. पोलीस भरतीची प्रक्रिया आणि वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढी मोठी मेगाभरती ही राज्यात प्रथमच होत आहे .त्यात मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट द्वारे दिले. त्या मुळे मराठा समाजातील तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पोलीस दलातील सर्व साडेबारा हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती परंतु राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरतीस मनाई करण्यात आली होती.