पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार –  जिल्हाध्यक्षक वंचित बहुजन आघाडी

0 27

अहमदनगर  – प्रतिक अरविंद बारसे जिल्हाध्यक्षक वंचित बहुजन आघाडी अहमदनगर हे १२ जानेवारी २०२१ रोजी त्यांना आणि त्याच्या पक्षाचे कार्यकर्त्यासोबत पत्रकार प्रशांत पाटोळे यांना झालेल्या मारहाणी बद्दल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार देण्यासाठी गेले असता  पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी पक्ष आणि त्याच्या बद्दल अपशब्दचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक मानगावकर यांची तक्रार पोलिसअधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एक निवदेनाद्वारे केली आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी  कि  काल दि.१२ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ७.३० वाजेचे दरम्यान मी व माझे सोबत माझ्या पक्षाचे कार्यकर्त्यासोबत पत्रकार प्रशांत पाटोळे यांना झालेल्या मारहाणी संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यावेळी वादग्रस्त पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी तुम्ही ईथे का आलात असे विचारत तुझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत, तु पोलीस स्टेशनला का आला असे विचारुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली त्यावेळी दैनिक मराठवाडा केसरीचे संपादक श्री.अशोक झोटींग साहेब हे त्यांना सांगत होते की, हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत .

त्यावर वादग्रस्त मानगांवकर यांनी वंचित बिंचित राहु दे बाजूला पुन्हा जर पोलीस स्टेशनमध्ये दिसला तर तुला तोडुन टाकीन असे मा.पोलीस उपअधीक्षक श्री.विशाल ढुमे साहेब, यांच्यासमोर बोलले त्यावेळी पत्रकार त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतू ते काहीही ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते व शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणुक दिली. तसेच वंचित बिंचित राहु दे असे अपमानास्पद शब्द पक्षाबाबत त्यांनी जाणीवपुर्वक काढुन माझी व पक्षाची जाणीवपुर्वक मानहानी केली व समाजामध्ये जातीयवादेचा तिडा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Related Posts
1 of 1,301
असे वक्तव्य एका जबाबदार पोलीस निरीक्षक या पदावर असणारे यास अशोभनिय आहे व समाजासाठी घातक देखील आहे. मानगावकर यांचे मनात माझे बद्दल व माझा पक्ष वंचित बहुजन आघाडी बद्दल नक्कीच जातीयवादी घृणा आहे व त्यांची तश मानसिकता आहे. भविष्यात त्यांच्याकडुन माझेवर खोटे गुन्हे दाखल करण्याची व माझे जीवीताला हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच त्यांच्याकडुन अशा वागणुकीमुळे व घृणास्पद संभाषनामुळे समाजामध्ये जातीयवादाला वाव मिळेल. याबाबत आपण सि.सी.टि.व्ही.फुटेज बघुन शहानिशा करुन पोलीस निरीक्षक मानगावकर यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी पोलिसअधीक्षक यांच्या कडे केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: