पोलीसांमधील देवमाणूस  ; तब्बल १० वर्षांनी बाप – लेकीची भेट 

0 54
Related Posts
1 of 2,052

अहमदनगर : बापाचं आणि लेकीचं नातं हे खूप जवळचं , आई ला लेक जवळचा असतो तर बापाला लेक जवळची असते . पण बाप अचानक दिसेनासा झाला तर लेकीला होणार दुःख हे फक्त तिलाच माहिती . अशीच काहीशी घटना घडलीये ते विसापूर , श्रीगोंदा येथे घडली . बुधवारी दुपारी गव्हाणेवाडीत ६५ वर्षीय बेवारस अवस्थेत ज्येष्ठ व्यक्ती सापडली हेड कॉस्टेबल शिंदे यांनी या व्यक्तीला जेऊखाऊ घातले आणि चौकशी केली असता देविदास पोपरे असे नाव असून बीड चा असल्याचे सांगितले , पण बीडला आपले कोणी नसून रानगवे शिंगोरे , शेवगाव येथे आपली मुलगी गंगुबाई  साखळे राहते . हि माहिती कळताच हेड कॉन्स्टेबल शिंदे यांनी एका खाजगी वाहनातून वडिलांना मुलीच्या गावी पोहोच केले , बापाला पाहून मुलीचे अश्रू अनावर झाले आणि काही बोलताही येईना , दे दृश्य पाहून पोलिसांनाही अश्रू अनावर झाले . गंगुबाईंच्या सांगण्याप्रमाणे १० वर्षांपूर्वी वडील घर सोडून गेले असता त्यांचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु ते सापडले नाहीत , पण आज पोलिसांनी माझ्या वडिलांची आणि माझी भेट घडवून आणली त्याबद्दल मी आयुष्यभर  ऋणी राहील असही त्या म्हणाल्या . कॉन्स्टेबल शिंदे यांना पोलीस निरीक्षक अरविंद माने , उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांनी मार्गदर्शन केले .  

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: