
राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . खालिद गुड्डू यांना खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे . खालिद गुड्डू आधी राष्ट्रवादीमध्ये होते जे शहराध्यक्ष होते, त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली होती.एवढंच नाही तर ते माजी नगरसेवक आहेत.
भिवंडी शहरातील बांधकाम व्यावसायिकाने तक्रार केली होती , त्यावरून पोलिसांनी सापळा रचत एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांना सव्वा लाख रुपयांच्या खंडणी घेताना पकडले. यामध्ये खालिद गुड्डू आणि त्यांच्या भावासहित चौघांना अटक करण्यात आली आहे .कलम 364 अ, 386, 387, प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी तब्बल ३०-३५ पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. झाल्या प्रकारावरून सर्वांना धक्का बसला आहे तसेच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे .