पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश 

0 31
जामखेड – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर हजर न होता फरार झालेला रामकिसन उत्तम साठे (५०) जवळके ता जामखेड याला जामखेड पोलीसांनी पूणे येथुन मोठ्या शिताफीने जेरबंद केले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Related Posts
1 of 1,291
रामकिसन उत्तम साठे यास सेशन कोर्ट अहमदनगर यांनी ३०२ च्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना सदर आरोपी हा आपल्या मुळगावी जवळके ता.जामखेड येथे पॅरोलवर सुटला होता. पॉरोल ची रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता.

                                                                                            जिल्ह्यात गो तस्करांचे पोलिसांना आव्हान
त्यावरून येरवडा जेल येथील पोलीसांनी जामखेड पो.स्टे.येथे गु.र.नं.१३६/२०१३ भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता दि ७ जाने रोजी .पो.नि.संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, रामकिसन उत्तम साठे हा विठ्ठलवाडी,देहु रोड ता.हवेली जि.पुणे येथे आपली ओळख लपवुन राहत आहे. अशी खात्रीशीर माहितीनुसार पो. नि. संभाजी गायकवाड यांनी याबाबत वरीष्ठांना कळवुन तपासपथकास या‍ठिकाणी जाण्यास कळविले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार हे तात्काळ रवाना होवुन देहु रोड, पोलीस स्टेशन जि.पुणे यांची पेालीस मदत घेवुन नमुद मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून उत्तम साठे यास जागीच ताब्यात घेण्यात घेवुन जामखेड पेालीस स्टेशनला आणले व दि ८ रोजी.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जामखेड यांचेसमोर हजर केले असता न्यायालयाने पुन्हा एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे .
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अहमदनगर, अपर पेालीस अधिक्षक सो.अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश जानकर ,पोना.ज्ञानदेव भागवत, पो. कॉ. शिवंलिग लोंढे, पो.कॉ संग्राम जाधव , पो. कॉ आबासाहेब आवारे ,व देहु रोड,पुणे पोलीस यांचे मदतीने केली आहे.
Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: