पूर्व विदर्भात पाणी- पाणी

भंडारा- महाराष्ट्रमध्ये एकी कडे कोरोना तर दूसरी कडे पाउस
मध्यप्रदेशात झालेल्या पाऊस व नंतर संजय सरोवरातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे विदर्भातील मुख्य शहरे नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी वाढली आहे व त्याचा फटका या पूर्व विदर्भातील मुख्य शहरांना बसत आहे.
सध्या पूर्व विदर्भातील अनेक शहरांमध्ये पाणी साचले आहेत तेथे पुराची स्थिती निर्माण झाली आहे गोदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीला महापूर आल्याने जिल्ह्यातील १८ ते २० गाव पाणी पाणी झाले आहे. जिल्ह्यातील पुजारीटोला आणि अंतरराज्यातील बावनथडी प्रकल्पातून काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
यामुळे भंडारा जिल्हा हे पाणीमय झाला आहे.राज्य व्यवस्थापक पथकाच्या मदतीने गावातील लोकांची मदत केली जात आहे. गोदिया तालुक्यातील जवळपास चाळीस तसेच तिरोडा तालुक्यातील दहा ते बारा गावांना पुराचा फटका बसला आहे.
या वर राज्यातील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हणले की मी पुरस्थीचा सातत्याने आढाव घेत अाहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सर्व यंत्रणांशी समन्वय साधून अाहे.